Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशाहू महाराज यांचे विचार व कार्य देशाला प्रेरणादायी - महादेव खुडे

शाहू महाराज यांचे विचार व कार्य देशाला प्रेरणादायी – महादेव खुडे

नाशिक : राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कार्य हे सर्व क्षेत्रातील पथदर्शक आहे. समाज बदल घडवून आणण्यासाठी कृतिशील तेचि गरज असते. शाहू महाराज हे नुसते बोलते नव्हते तर प्रत्येक घेतलेला निर्णय, विचार कृतीतून स्वतःपासून सुरू केली होती. म्हणून शाहू महाराज हे महापुरुष आहेत. महात्मा फुले चा सत्यशोधक चळवळ चा वारसा कृतीतून पुढे नेण्याचे कार्य त्यांनी केले. सर्व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी व मुलींनी शिक्षण घ्यावे यासाठी वसतिगृह ची चळवळ व शिक्षण साठी अनेक संस्थांना बाहेरील भागात सुद्धाआर्थिक मदत केली आहे. सामाजिक ऐक्यासाठी केलेले कार्य तसेच शेतकरी, जलसिंचन बाबत केलेले कार्य नेहमी स्मरणात राहील. भारतात अनेक राजे होऊन गेले मात्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य लोकाभिमुख असल्याने नेहमी प्रेरणा देणारे आहे. आरक्षण चे जनक असलेले शाहू महाराज यांनी आरक्षण चे महत्त्व उदाहरण तुन स्पष्ट केले होते. दूरदृष्टी असलेला व समाजाच्या सर्व घटकांचा विचार व कृती करणारा राजा च्या स्मृती शताब्दी वर्षात कार्य समजून घेतले पाहिजे. आजही हे विचार देशासाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन महादेव खुडे यांनी केले.

ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक येथे राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती नाशिक वतीने मराठा विद्या प्रसारक समाज शाळा व महाविद्यालयातील 350 शिक्षक प्राध्यापक ची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सुरुवात झाली.

शाहू महाराज यांचे विचार व कार्य नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी युवक पर्यन्त पोहचावे यासाठी 5000 व्याख्यानचे आयोजन करण्याचा संकल्प स्मृती समितीने केला आहे. उपस्थित शिक्षण प्राध्यापक यांनी शाळा महाविद्यालयात प्रत्यकाने जानेवारी पर्यन्त 5 व्याख्यान द्यावेत असे नियोजन आहे. शाहू महाराज यांनी नाशिक ला दिलेली भेट उदोजी मराठा वसतिगृह, वंजारी बोर्डिंग्, शाहू बोर्डिंग ला केलेली मदत प्रेरणा देणारी आहे. आपण सर्व लाभार्थी आहोत. आपण त्यांचा विचार व कार्य पोहचवण्यासाठी प्रयत्न करू या असे आवाहन कार्यशाळा च्या प्रास्ताविक करतांना मविप्र संस्थेचे शिक्षण अधिकारी प्रा. एस के शिंदे यांनी केले.

कार्यशाळेला शाहू महाराज आणि नाशिक या विषयावर प्रा. डॉ रामदास भोंग यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी ‘छत्रपती शाहू महाराज वसा आणि वारसा’ ॲड. गोविंद पानसरे लिखित पुस्तिका शिक्षकांनी घेतल्या. समितीचे अध्यक्ष राजू देसले यांनी शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात 5 हजार व्याख्यान शिक्षक व प्राध्यापक यांनी द्यावेत यासाठी नियोजन सुरू आहे आज ह्याची सुरुवात मविप्र संस्थेपासून करतांना आनंद होत आहे. ज्या स्थळाला शाहू महाराज यांनी भेट दिली त्या ठिकाणी कार्यशाळा होत असल्याने संस्थेचे आभार मानतो. व आज सहभागी असलेल्या300 वर शिक्षण प्राध्यापक यांनी 5 व्याख्यान देऊन विध्यार्थी युवक पर्यन्त शाहू महाराज यांचे कार्य पोहचवूया, याची गरज आहे असे प्रतिपादन केले.

नाशिक जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था मधील शिक्षक, प्राध्यापक ची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. कार्यशाळा चे सूत्रसंचालन समितीचे सरचिटणीस जयवंत खडताळे यांनी केले. विचारमंचवर प्रभाकर धात्रक, व्ही. टी. जाधव, एस के शिंदे, शिवदास म्हसदे, महादेव खुडे, रामदास भोंग, राजू देसले उपस्थित होते. आभार शिवदास म्हसदे यांनी मानले.

हेही वाचा

इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय