वसतिगृह न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्रातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. या विद्यापीठांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोरगरिबांची मुले शिकण्यासाठी येत येतात. पुण्यासारख्या शहरांमध्ये निवास व्यवस्था सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारी आहे त्यामुळे वसतिगृह मिळाले नाही तर शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. अनेक विद्यार्थी त्यामुळे प्रवेश रद्द करत आहेत. त्यामुळे सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे अशी मागणी एसएफआयने केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले तर प्र- कुलगुरू यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.
अनिकेत कॅन्टीन पुन्हा सुरू करावे. रिफेक्टरीच्या समोरील प्रांगणात खुला सांस्कृतिक मंच सुरू करून त्यास लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे. त्याचबरोबर सेट परीक्षा घेण्यात यावी. विद्यापीठातील विविध विभाग व वसतिगृहातील सर्व प्रश्न त्वरित सोडवावेत अशी मागणी केली आहे. सर्व प्रश्न लवकरात लवकर सुटले नाही तर एसएफआय तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी एसएफआयचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, पुणे शहर उपाध्यक्ष भार्गवी लाटकर, सहसचिव गणेश जानकर, रोहित भामरे, तनिषा कौर, सोमनाथ वामन, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.