Tuesday, May 7, 2024
Homeराज्यमराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध – माकप 

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध – माकप 

मुंबई : जालना जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. हवेत गोळीबार केला. पोलिसांच्या या अमानुष कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र शब्दात धिक्कार करत आहे, असे माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर म्हणाले. CPIM strongly condemns lathi charge on protesters for the demands of Maratha community

डॉ. नारकर पुढे म्हणाले, देशभरातील सर्व प्रमुख विरोधी नेते इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रात हजर असताना आंदोलकांवर झालेला हल्ला म्हणजे राज्य सरकार कुणालाच जुमानत नसल्याचे व विरोध करणारांना चिरडून काढणार असल्याचा संदेश देणारे आहे. राज्य सरकारचा हा दृष्टिकोन अत्यंत निषेधार्ह आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय