Friday, April 26, 2024
Homeताज्या बातम्याट्रक - जीप चा भीषण अपघात, 7 ठार

ट्रक – जीप चा भीषण अपघात, 7 ठार

बीड : अंबाजोगाई – लातूर राष्ट्रीय महामार्गावर सायगावजवळ जीप (Jeep) आणि ट्रक (Truck) च्या झालेल्या भीषण अपघातात (Severe Accident) सात जणांचा मृत्यू झाला आहे. क्रूझर गाडी आणि ट्रकची एकमेकांना वेगाने धडक बसून एकूण 7 जण ठार (7 Killed) झाले आहेत. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, एका महिलेचे आणि बालकाचे धड रस्त्यावर तुटून पडले. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचे समजते.

लातूर येथील आर्वी गावातून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे कार्यक्रमासाठी जात असलेल्या गंगणे कुटूंबियांच्या क्रुझर गाडीचा ( क्र.एम.एच. 24 व्ही 8061 ) समोरून येणाऱ्या ट्रक ( क्र.आर.जे. 11 जी.ए .9210 ) सोबत समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला.

समोरासमोर धडक झाल्यामुळे सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाल्या असून रुग्णालयात उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

बॉम्बे उच्च न्यायालयात 25 रिक्त जागांसाठी भरती, 50,000 रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !

केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !

केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय