Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनिलेश अंकुशराव मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करा - कामगार नेते बाबा...

निलेश अंकुशराव मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करा – कामगार नेते बाबा कांबळे यांची मागणी

आंतरजातीय विवाहामुळे घातपाताची शक्यता, पिंपरीत निदर्शने

कष्टकरी कामगार पंचायत, आंबेडकरी संघटनांची मागणी

पिंपरी चिंचवड : शहरातील निगडी मधील रहिवाशी निलेश संजय अंकुशराव याचा चार वर्षांपूर्वी सोलापूर येथील अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या प्रियंका औदुंबर क्षिरसागर या युवतीशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. परंतु या विवाहास त्या युवतीच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. विवाह झाल्यापासून मुलीच्या कुटुंबीयांकडून मुलास वारंवार त्रास देण्याचे प्रकार सुरू होते. यातच अनेक वेळा निलेशला जातीय द्वेषाचे मानसिकतेतून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी सोलापूर येथे गेलेल्या निलेशचा दि.17 एप्रिल 2022 रोजी अक्कलकोट येथील आयोध्या लॉजमध्ये मृतदेह गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळून आला. 

निलेश अंकुशराव याच्या संशयास्पद मृत्यू संदर्भात आम्ही काही प्रश्न उपस्थित करीत आहोत, याची चौकशी तात्काळ होणे अपेक्षित आहे.असे बाबा कांबळे यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कातकरी समाज जगतोय अद्यापही पारतंत्र्यात, नदीकिनारी धोकादायक वास्तव्य

ट्रक – जीप चा भीषण अपघात, 7 ठार

लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दाखवण्यात आले नाहीत. मयत निलेश अंकुशराव याच्या उजव्या पायावर तसेच पाठीवर मारहाणीच्या जखमेच्या खुणा होत्या. तसेच लॉजमध्ये आढळून आलेल्या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर निलेशच्या हस्ताक्षराची मॅच होत नाही. तसेच पोलिसांनी लॉजमधून मयत निलेशची गळफास घेतलेल्या अवस्थेतील बॉडी उतरवताना जे व्हिडीओ चित्रीकरण केलेले आहे, त्यामध्ये निलेश हा बेडवर बसलेल्या अवस्थेत असून त्याचे पाय जमिनीला टेकलेले आहेत व फॅनला बांधलेली ब्लॅंकेट ही निलेशच्या गळ्याला बांधलेली आहे. तसेच पोलिसांनी लॉजमधून मयत निलेश निलेशची गळफास घेतलेल्या अवस्थेतील बॉडी उतरवताना जे व्हिडीओ चित्रीकरण केलेले आहे, त्यामध्ये सुसाईड नोटचे तीन ते चार पाने दिसत आहेत. तरीदेखील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनाम्यामध्ये एकच सुसाईड नोट दाखवलेली आहे.

तसेच आयोध्या लॉजमध्ये निलेश हा थांबला होता, त्या लॉजमध्ये संध्याकाळी एक रिक्षा चालक व्यक्ती त्याच्या रूममध्ये गेली होती, असे लॉजमधील काम करणारा कमलेश ही व्यक्ती सांगत होती. त्यामुळे त्या रिक्षाचालकाची ही चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच निलेश याचा दि.17 एप्रिल 2022 रोजी रात्री 10.08 मिनिटांनी त्याच्या आईला फोन आला होता, त्या फोनमध्ये “आई मला प्रियंका, तिचा भाऊ, तिचे वडील, तिची आई तसेच अन्य व्यक्तींनी खूप मारहाण केलेली आहे. मला खूप त्रास होत आहे. असे बोलून त्याने फोन ठेवून दिला, त्यानंतर त्याच्या आईने त्याला पुन्हा संपर्क केला. परंतु त्याचा फोन हा स्विच ऑफ येत होता. 

सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी

कोकण कृषी विद्यापीठात तब्बल 30,000 रूपये पगाराची नोकरी, 2 दिवस शिल्लक

निलेश अंकुशराव याचा मृत्यू संपूर्ण संशयास्पद असून, या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या साठी दि. 23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे निदर्शने आंदोलन करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते बाबा कांबळे अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत महाराष्ट, आर पी आयचे सुरेश निकाळजे, निलेश निकाळजे, धम्मराज साळवे, शिवशंकर उबाळे, अंजना गायकवाड, अनिता साळवे, मेधा आठवले आदींनी केले.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय