Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तृतीयपंथीयांसाठी बस - मेट्रो राईड उपक्रम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तृतीयपंथीयांसाठी बस – मेट्रो राईड उपक्रम

पिंपरी चिंचवड, दि 22 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तृतीय पंथीयांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बस – मेट्रो राईड या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 22 एप्रिल 2022 रोजी तृतीयपंथी यांना मोफत निगडी बस स्टँड पासून पिंपरी मेट्रो स्टेशन व पिंपरी स्टेशन ते फुगेवाडी व परतीचा प्रवास करण्यात आला. त्यावेळी त्यांना मेट्रोबद्दल माहिती देण्यात आली.

स्मार्ट सिटीकडून मोबाईल ऍपबद्दल माहिती दिली. ऍपमध्ये विविध सेवांमध्ये स्पर्धेत लिंग निवडताना पुरूष, स्त्री आणि तृतीयपंथी असे तीनही पर्याय आहेत याचा आवर्जुन उल्लेख केला. डिजीटल माध्यमातून सामाजिक समानता साधण्याचा प्रयत्न केला आहे. तृतीपंथीयांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुकास्पद होत असून सामाजिक बदल होण्यासाठी मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक ! 20 वर्षाच्या तरूणीला कोल्ड्रिंक्स मधून गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

4 थी / 10 वी / 12 वी / Pharmacy विद्यार्थ्यांसाठी संधी ! गोंदिया जिल्हा परिषदेत २५ हजार रूपये पगाराची नोकरी, 3 दिवस बाकी

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील, उपआयुक्त अजय चाठणकर यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमा वेळी अनेक तृतीयपंथी, समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपूरे, स्मार्ट सिटीचे अमोल देशपांडे, मेट्रोचे अधिकारी, आशा भट्ट, अध्यक्षा मंथन फाउंडेशन व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय