Thursday, July 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडराष्ट्रवादीच्या करारा जबाब जंगी सभेला चिखलीतून २०० कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल

राष्ट्रवादीच्या करारा जबाब जंगी सभेला चिखलीतून २०० कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल

पिंपरी चिंचवड : तपोवन मैदान कोल्हापूर येथील परिवार संवाद यात्रेच्या सांगता समारंभासाठी जाधववाडी, चिखली, भोसरी येथून २५ वाहनातून २०० हुन जास्त कार्यकर्ते आज कोल्हापूरला रवाना झाले.

चिखली, जाधववाडी, कुदळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख पदाधिकारी, युवानेते विशाल आहेर यांच्या नेतृत्वाखाली चिखली, जाधववाडी येथील जनसंपर्क कार्यालयापासून वाहने कोल्हापूरला रवाना झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक मनोज आहेर तसेच सागर आहेर, प्रमोद करपे, विजय आहेर, अनिल साळुंखे, राहुल सोनवणे, रोहित गायकवाड, आनंद जाधव, स्वप्निल चौधरी यांच्यासह 200 कार्यकर्त्यांची टीम या सभेला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, कराड येथे त्यांच्या वाहनांचा काफिला थांबलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर संघटक केतन जाधव म्हणाले, कोल्हापूर हे सामाजिक परिवर्तनाचे केंद्र आहे, महाराष्ट्रात विशिष्ट संकुचित विचारधारा प्रसारित करण्यासाठी काही विरोधी शक्ती काम करत आहेत. शिवछत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, पालकमंत्री अजित पवार या जंगी सभेत विरोधकांना करारा जबाब देणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून आम्ही राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी परिवर्तन यात्रा सांगता सभेला जात आहोत.

संपादन – क्रांतिकुमार कडूलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय