Tuesday, May 7, 2024
Homeजुन्नरजुन्नर : मांदारणेच्या जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी अभियान मेळावा संपन्न

जुन्नर : मांदारणेच्या जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी अभियान मेळावा संपन्न

ओतूर / महेश घोलप : पुणे जिल्हा परिषदेचा (Pune Zilla Parishad) शाळा (School) पूर्व तयारी उपक्रम प्रत्येक प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असून हा दिवस जवळपास सर्वच प्राथमिक शाळेच्या ठिकाणी एक उत्सव म्हणून उस्फुर्तपणे विविध प्रकारचे कौशल्य विकासाधीन पध्दतीने साजरा केला जात आहे. मांदारणे ता.जुन्नर (Junnar) येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल पात्र मुलांचे प्रवेशद्वारावर औक्षण व कुंकुंमंतीलक करून ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

कातकरी समाज जगतोय अद्यापही पारतंत्र्यात, नदीकिनारी धोकादायक वास्तव्य

यावेळी अंगणवाडीतुन इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फुगे, गुलाबपुष्प, लेखन साहित्य देऊन गौरविण्यात आले. पालकांनी मुलांना गोड खाऊ देऊन कौतुक केले आणि गावातून मुख्य बाजार पेठेतून वाजत गाजत मिरवणूक काढली.

जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

या कौतुक सोहळा प्रसंगी मांदारणे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सविता ठोसर, उपसरपंच शारदा भोर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिमन्यू महाकाळ, उपाध्यक्षा अस्मिता महाकाळ, तसेच पालक म्हणून प्रवीण ढमाले, सुरेश ठोसर, विनोद महाकाळ, मोनिका भोर, अस्मिता भोर, सुरेखा डुंबरे, मुख्याध्यापक विलास घोलप, सहशिक्षिका तृप्ती कर्डीले, याशिवाय अनेक ग्रामस्थांनी हा शाळा पूर्व तयारी कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला.

सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी

कोकण कृषी विद्यापीठात तब्बल 30,000 रूपये पगाराची नोकरी, 2 दिवस शिल्लक


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय