Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाकातकरी समाज जगतोय अद्यापही पारतंत्र्यात, नदीकिनारी धोकादायक वास्तव्य

कातकरी समाज जगतोय अद्यापही पारतंत्र्यात, नदीकिनारी धोकादायक वास्तव्य

ओतूर : येथील नदीकिनारी धोकाडायकपणे वास्तव्य असलेली कातकरी वस्ती.


शासकीय सुविधांपासून वंचित घटक

जुन्नर / महेश घोलप : कातकरी  समाजातील ( Katkari Community) लोकांना घर कसले? फाटक्या, ठिगळ लावलेल्या कपड्यांची, गवत काडीपासून तयार केलेली व अठरा विश्व दारिद्र्य असलेली झोपडीच ती, एव्हढीच एकमेव संपत्ती व म्हणायला घर तेही नदीच्या काठावर खोल पाण्याच्या शेजारीच अत्यंत धोकादायक वास्तव्य.

झोपडी समोरच्या अंगणात हातात एखादी कैरी, चिंचेचा आकडा कौठ, पेरू, बोरे अथवा भाकरीचे वाळलेले तुकडे घेऊन उड्या मारणारी उघडी नागडी खेळणारी पोरं, झोपडीत एक अंथरलेली गोधडी, तीन दगडाच्या चुलीवर पूर्ण काळे झालेले पातेले, बाजूला विखुरलेली २/५ जर्मलची भांडी, शेणाच्या गवरीचा गठ्ठा, सरपण, खायला काही कंदमुळे वगैरे वगैरे त्यांचे मुलांना नाही शाळा, नाही रेशन कार्ड, ना रेशन. वर आभाळ खाली जमीन उन्हापासून बचावा साठी झाडांची सावली, जीवनात संपूर्ण अंधारच अंधार ही व्यथा आहे महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारत (India) देशातील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील उत्तर पुणे (Pune) जिल्ह्यातील विखुरलेल्या कातकरी समाजाची.

जुन्नर परिसरात बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी

ज्यांच्या जीवनाकडे आजही पाहिले तर हा समाज अद्यापही पारतंत्र्यात जीवन जगत असल्याचे निदर्शनास येते. कातकरी समाज घटक हा बहुतांश निरक्षरच परिणामी शासकीय योजनांची (Government Schemes) माहिती एक तर त्यांचे पर्यंत पोहचतच नाही अथवा तेही चौकशीला जात नाहीत. परिणामी हा घटक शासकीय योजना, सेवा, सुविधांपासून कोसो दूर असल्याचे जाणवते.

मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना सर्व सुविधा मिळणे क्रमप्राप्त असताना शासनाचे कुठेतरी चुकते आहे हे त्यांचे झोपडे पाहिल्यावर उमगते. कातकरी समाज आजही मासेमारी, खेकडे व कंदमुळे खाऊन उदरनिर्वाह करीत आहे. खरे तर अशा भटक्या कातकरी समाजाचे जीवनमान उंचावेल, त्यांची लेकरे शालेय शिक्षण प्रवाहात असल्याचे दृष्टीस पडतील तेव्हा कुठे भारत महासत्ता बनतोय असे म्हणता येईल. स्वातंत्र्यानंतर नंतर ही कातकरी समाज पारतंत्र्यात जगत आहेत.

जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

12 वी, पदवीधर आणि खेळाडूंसाठी भारतीय रेल्वे नोकरीची सुवर्णसंधी संधी, अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय