Friday, May 17, 2024
Homeराज्यRMBKS : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे ४ थे महाराष्ट्र राज्य अधिवेशन...

RMBKS : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे ४ थे महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न! 

पालघर : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे ४ थे महाराष्ट्र राज्य अधिवेशन काल दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश पाटील यांचे अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे स्वर्गीय किशोर संखे सभागृह बोईसर पश्चिम तालुका व जिल्हा पालघर येथे मोठ्या संख्येने संपन्न झाले. 

भारतातील कामगार वर्गाच्या समस्या, सरकारी विभागांचे खाजगीकरण, कंत्राटीकरण, नवीन कामगार कायदे करून कामगारांना संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवणे, असंघटित कामगार व बांधकाम कामगार यांना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याची सरकारची षड यंत्रकारी भूमिका , ट्रेड युनियन ची कर्तव्य व गावपातळीवर रोजगार हमी योजने अंतर्गत मिळणारे लाभ इत्यादी गंभीर विषयांवर अधिवेशनात चर्चा झाली.

जुन्या पेन्शनची समस्या प्रभावी जनआंदोलना शिवाय सुटू शकत नाही, सरकारी शाळांचे खाजगीकरण आणि मनुवादी विचारसरणीचे नवीन शैशनिक धोरण याचे मूलनिवासी भारतीयांच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम, फेरीवाल्यांना त्यांचा उद्योग किंवा व्यापार करण्यापासून रोखने आणि त्यांचे आर्थिक शोषण करणे त्यांना मारहाण करणे हा संविधान द्रोह आहे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मानधन तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवकांना शासनाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून शासन सेवेत समावेश करण्यासाठी तसेच सेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना मिळणारी पेन्शन बंद करण्याचे केंद्र सरकारने आखलेले दुष्ट धोरण इत्यादी कर्मचारी यांचे जीवन मरणाशी निगडित प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारणे यांसारख्या अति महत्त्वाच्या विषयांवर अधिवेशनात गंभीर चर्चा करून ट्रेड युनियनच्या माध्यमातून देशभर केंद्र शासनाच्या व राज्य सरकारच्या विरोधात मोठी जनआंदोलने उभारण्याबाबत निर्णय घेणेत आला. 

या अधिवेशनाला देशभरातील कर्नाटक, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र इत्यादी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बामसेफची राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य तसेच कामगारवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जवळपास चारशे प्रतिनिधीनी उपस्थित राहून हे अधिवेशन संपन्न केले.

रत्नागिरी येथून या अधिवेशनाला बामसेफचे राज्य अध्यक्ष अशोक भाटकर तसेच जिल्हा पदाधिकारी मिलिंद नार्वेकर, प्रशांत किर, अभय आग्रे, संजय जिनगारे इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय