Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकिरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे खरे चरित्र उघड - आप

किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे खरे चरित्र उघड – आप

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता आम आदमी पक्षाने भाजपवर टीका केली आहे. आपने किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे खरे चरित्र उघड होत असल्याची टीका आप महिला आघाडी अध्यक्षा सीता केंद्रे यांनी केली आहे.

सीता केंद्रे यांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होत आहे हे भाजपाच्या इतर अनेक नेत्यांच्या चरित्राचे ट्रेलर आहे, महिलांचे शोषण करण्यात भाजपाचे अनेक नेते एक्सपोज होत आहे, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी येतात परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे गुन्हे नोंदविले जात नाहीत, किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी सोमोटो कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी केंद्रे यांनी केली आहे.

भाजपाचे अनेक नेते सार्वजनिक जीवनात वागताना लोकांसमोर त्यांचे वेगळे चरित्र दाखवितात आणि खऱ्या जीवनात बंद दरवाज्याच्या आत ते आपले गुण दाखवीत असतात, कधी महिलेला धमकावून तर कधी महिलेचा गैरफायदा घेत अशा प्रकारे महिलांचे शोषण केले जात आहे असाही आरोप सीता केंद्रे यांनी केला आहे.

हे ही वाचा :

PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय