Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूडअभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना...

अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. आजकाल अनेक सेलिब्रिटी कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत. अशात आता अभिषेक बच्चन राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन रविवारी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होऊ शकतो, अशी चर्चांना उधाण आलं. इतकंच नव्हे तर २०२३ मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून अभिषेत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे असंही बोललं जात होतं. मात्र आता या वृत्तांचे सत्य समोर आले आहे.

वेबसाइट ‘ई-टाइम्स’नुसार, अभिषेक बच्चन राजकीय प्रवेश करत नाहीये. हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत. अभिषेक बच्चनने २०१३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राजकारण प्रवेशाबद्दल विचारण्यात आले होते. वडिलांप्रमाणे निवडणूक लढवता येईल का, असे विचारले असता अभिषेक म्हणाला होता की, पडद्यावर राजकारण्याची भूमिका नक्कीच साकारू शकतो पण खऱ्या आयुष्यात राजकारणात कधीच प्रवेश करणार नाही.

दरम्यान, अभिषेक बच्चन यांचे वडील अमिताभ बच्चन यांनी अभिनयातून ब्रेक घेत १९८४ मध्ये राजकारणात नशीब आजमावले. त्यानंतर राजीव गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बिग बींनी राजीनामा दिला होता. त्याचबरोबर अभिषेक बच्चनची आई आणि अभिनेत्री जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत.

हे ही वाचा

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

मोटार : एक मानवीनिर्मित अरिष्ट – नवनाथ मोरे

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय