Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयधक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबाद येथील मेडिकल कॉलेजच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने गुप्तांग कापून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षांचा दीक्षित रेड्डी रविवारी त्याच्या यादगिरीगुट्टामधील घरात बेशुद्धावस्थेत सापडला. त्याच्या गुप्तांगाला जखम होती. त्यातून रक्तस्राव सुरू होता. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दीक्षित रेड्डी हा आई आणि बहिणीसोबत राहत होता. हैदराबादच्या गांधी रुग्णालयात तो शिक्षण घेत होता.

रविवारी घरातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले. दुपारी दीक्षितने जेवन केल्यानंतर तो स्वत:च्या खोलीत गेला. यानंतर त्याने ब्लेडने गुप्तांग कापले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

तणावाखाली होता दीक्षित
गेल्या काही दिवसांपासून दीक्षित तणावाखाली होता. दीक्षितच्या मित्रानं आत्महत्या केली होती. तेव्हापासून दीक्षित तणावाखाली होता. तणावमुक्तीसाठी तो औषधं घेत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याने औषधं बंद केली होती. दीक्षित रेड्डीनं चार वर्षांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्यावेळी त्याचा जीव वाचला.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये काकतिया मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. डी. प्रीती यांचा वादग्रस्त परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांचे वरिष्ठ डॉक्टर मोहम्मद सैफ या घटनेची चौकशी करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला तेलंगणामध्ये आणखी दोन डॉक्टरांच्या आत्महत्या झाल्या आहेत. एम सनथ (२१) हा एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आणि चौथ्या वर्षाचा विद्यार्थी दसरी हर्ष (२२) यांचा फेब्रुवारीमध्ये मृत्यू झाला होता. या संबंधीचे वृत्त न्युज १८ हिंदीने दिले आहे.

हे ही वाचा

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

मोटार : एक मानवीनिर्मित अरिष्ट – नवनाथ मोरे

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय