Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड'सीमे'पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

सचिनच्या प्रेमासाठी नवऱ्याला सोडून चार मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर नेमकी कोण आहे,ती पाकिस्तानची हेर असावी असे अनेक तर्क वितर्क सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मेडियासमोर उत्कृष्ट प्रेझेन्टेशन करून स्वतःच्या सचिनवरील प्रेमाचे जाहीर दाखले ती देत आहे,तिने हिंदू धर्म स्वीकारून तसा पेहेराव केला आहे. आणि ती तथाकथित अंधभक्ताच्या कौतुकास पात्र ठरत आहे, इन्स्टाग्राम, फेसबुकवर सर्वात जास्त लाईक्स घेणारी, देशातील न्यूज चॅनल्स, पोर्टलच्या बातम्यांतून ती सतत बोलत असते, ती अति उत्कृष्ट इंग्रजी, हिंदी बोलतेय, ती पाचवी शिकलेली आहे, पाकिस्तानमधील ही एक सुंदर ललना आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलवर मोठ्या बातमीचा विषय झाली आहे. ही आहे तरी कोण आणि एका साध्या भोळ्या युवकाशी ती लग्न करून ग्रेटर नोईड डाच्या रबूपुरा भागात रहात आहे.


विवाह नोंदणी कार्यालयात सचिन सीमा गेली असताना तेथील वकिलाला संशय आला म्हणून पोलिसांनी तिला अटक केली,कोर्टाने तिला जामीन दिला आहे. ती पाकिस्तानी असल्यामुळे संशय दाटला आहे,भारतीय गुप्तचर संस्था तिच्या सर्व हालचाली व पूर्व इतिहास अतिशय गुढपणे तपासत आहेत,आणि तिच्याबद्दल संशय वाढत आहे,कारण ती पाकिस्तानमधील मुस्लिम महिला आहे, पण तिला कुराणातील आयत म्हणता येत नाहीत. ती घर विकून चार मुलांना घेऊन दुबईमार्गे नेपाळमध्ये तिथून भारतात येत असताना तिन्हीं देशातील सुरक्षा एजन्सीना कोणत्याही प्रकारचा संशय आला नाही,हे खूप मोठे आश्चर्य आहे. ती पाकिस्तान सैन्यातील अधिकारी असल्याच्या कॉमेंट्स सोशल मेडियावर व्यक्त झाल्या असल्या तरी हनी ट्रॅप द्वारे हेरगिरी करणाऱ्या महिला मुली सार्वजनिक जीवनात सीमा हैदर सारख्या प्रेझेंट होत नाहीत.


केजीबी, सीआयए, मोसाद किंवा भारताची ‘रॉ’ इत्यादी गुप्तहेर संस्थांमध्ये महिला हेर आहेत,पण त्यांचे अस्तित्व कुठे जाणवत नसते. दहशतवादी संघटनाशी संबंधित महिला,मुली यांनी मागील दशकात अनेक काळी कृत्ये केली आहेत, एलटीटीई या दहशतवादी संघटनेच्या धनु या महिला सुसाईड बॉम्बरने राजीव गांधी यांची हत्या घडवली आहे, त्यामुळे शत्रूराष्ट्र पाकिस्तान मधील ही सीमा हैदर देशविरोधी कृत्य करण्यासाठी चार मुलांना घेऊन भारतात येईल व इतकी बिनधास्त वावरत आहे त्यामुळे सीमा हैदर बाबत फक्त अंदाजे चर्चाना उधाण आले आहे. सीमा हैदरची पूर्णपणे माहिती जाहीर होईपर्यंत ‘सीमे’पालिकडील ही सीमा हैदर मीडियावर सुपर स्टार ठरली आहे.

संकलन – क्रांतिकुमार कडुलकर

चिखली जाधववाडी येथे येथील धोकादायक उताराचा रस्ता सुरक्षित करा – रोहन चव्हाण


नितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन

जागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय