Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन

नितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन

ऍड.असीम सरोदे, सुजात आंबेडकर यांचा आंदोलनाला पाठिंबा

पुणे
: आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना हे बघा हिजड्यांचे सरदार, असे वक्तव्य केले होते. त्याविरोधात पुण्यातील तृतीयपंथीयांनी पुण्यात पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथी आंदोलन केले. यावेळी नितेश राणे जिथे जातील तेथे त्यांना काळे फासण्याचा इशारा तृतीयपंथीय आंदोलकांनी दिला आहे.



तृतीयपंथी शामिभा पाटील म्हणाले की, 2019 साली तृतीयपंथी समूहाला सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत नागरिक म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राणे यांनी तृतीयपंथी समाजाचा अपमान केला आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना आमची मागणी आहे की आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तृतीयपंथीयांना समान अधिकार दिले जातात. मात्र अपमान करण्यात आला आहे. ही केस मानवी हक्क न्यायालयात ही केली जाऊ शकते.

आज जर कारवाई झाली नाही तर हे आंदोलक उच्च न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे, असं कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. ज्यांनी अपमान केला आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली आहे. जर आज पोलिसांनी कारवाई केली नाही. तर आम्ही संध्याकाळपर्यंत भूमिका जाहीर करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर दिला आहे.

काय सांगता ! टाटा कंपनी आता आय फोन बनवणार ?

मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’ ; आमदार महेश लांडगे यांनी केला पाठपुरावा

दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणा-या कोयता गॅंगवर कडक कार्यवाही ची मागणी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय