Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान

जागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणेचा उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे गटाच्या वतीने कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर चिंचवड पुणे. येथे दि.११/७/२०२३ रोजी ४ वा.जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कामगार सुखी जोडप्यांचा सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री.विजय पाटील मानव संसाधन अधिकारी मर्सिडीज बेंज चाकण, मा.श्री.सुहास गर्दे प्रमुख कामगार विभाग थरमॅक्स कं.लि.पुणे शारदा मुंडे समाजप्रबोधनकार, मोहन गायकवाड कामगार भूषण तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राज शिनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.



सदर कार्यक्रमात कामगार सुखी जोडपे कविता राजाराम साकोरे व राजाराम डी साकोरे (मॅग्ना स्टरीफाईड प्रायव्हेट लिमिटेड), भाग्यश्री उमेश भोसले व उमेश भोसले (थरमॕक्स कं लि), मंगल श्रीकांत कदम व श्रीकांत बाबुराव कदम (टाटा मोटर्स पिंपरी), सावनी स्वानंद राजपाठक व स्वानंद राजपाठक (एस. के. एफ कं), अनिता अमोल जगताप व अमोल जगताप (दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल) यांचा शाॕल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रुपये ५०००/- चा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.



कार्यक्रमात गुणवंत कामगार तानाजी एकोंडे, सुभाष चव्हाण, भरत शिदे, सुदाम शिंदे, सोमनाथ कोरे, बळीराम शेवते ई. मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक संजय सुर्वे कामगार कल्याण अधिकारी पुणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण वाडकर केंद्र संचालक घोरपडीगाव यांनी केले तर आभार प्रदीप बोरसे केंद्र संचालक उद्योगनगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संदीप गावडे, अनिल कारळे, सुनील बोरावडे, अश्विनी दहितुले, रूपाली मुळीक, सुरेखा मोरे, माया कदम, संगीता क्षीरसागर, भरत शहापूरकर, शंकर शेलार, भास्कर मुंडे यांनी संयोजन केले.

काय सांगता ! टाटा कंपनी आता आय फोन बनवणार ?

मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’ ; आमदार महेश लांडगे यांनी केला पाठपुरावा

दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणा-या कोयता गॅंगवर कडक कार्यवाही ची मागणी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय