Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’ ; आमदार महेश लांडगे यांनी केला पाठपुरावा

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: पर्यटनाच्या क्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जगाच्या नकाशावर यावे. या करिता महापालिका प्रशासनाच्या वतीने मोशी येथील आरक्षित जागेवर ‘‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क’’ विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला चालना द्यावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मोशी येथील आरक्षित जागी सेन्टॉस्सा पार्क, सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ साकारण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील गट नंबर ६४६ सरकारी गायरान जमिनीवर ३३.७२ हेक्टरचे क्षेत्र सफारी पार्क म्हणून आरक्षित (आरक्षण क्रमांक १/२०७) आहे. सफारी पार्कची आरक्षित जागा पुणे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सफारी पार्क’ विकसित होणार असल्याने समाविष्ट गावाच्या विकासांना आणखीन चालना मिळणार आहे. त्यामुळे सफारी पार्कचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना आहे. पर्यटन क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर पिंपरी-चिंचवडचे नाव उमटण्यासाठी हा प्रकल्प अत्यावश्यक आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सल्लागार कंपनी नियुक्त करावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया :

मोशी परिसरात पिंपरी-चिंचवडमधील कचरा डेपो आहे. संपूर्ण शहरातील कचऱ्याचा भार मोशी आणि परिसरातील नागरिक सहन करीत आहेत. आगामी काळात मोशीची ओळख ‘ मोशी कचरा डेपो’ अशी न राहता मोशीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी पार्क म्हणून निर्माण व्हावी, अशी आमची भावना आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.

महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार

कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद

रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles