आहेरवाडी चौकात अवजड ट्रक घसरला, मोठा अपघात होण्याची शक्यता
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली जाधववाडी ते कुदळवाडी येथील मुख्य सेवा रस्त्यावर आहेर चौकात रस्त्याला मोठा चढ-उतार आहे. स्पाईन रोड रोडला जोडणाऱ्या या रस्त्यावर अवजड वाहने, बसेस, नागरिकांची नोकरी व्यवसायानिमित्त मोठी ये जा असते. सावता माळी मंदिर व आहेरवाडी चौक या ठिकाणी रस्त्याचे चौपदरीकरण व चढ उताराचे विकसित नियोजन झालेले नाही.

त्यामुळे वाहने नियंत्रण सुटून उताराने बेधडक मागे येऊन अपघात होण्याची मोठी शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने येथील रस्त्याचा पुनर्विकास करावा, अशी मागणी चिखली येथील युवा नेते रोहन चव्हाण यांनी मा.आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली आहे. आज (12 जुलै) रोजी प्लायवूड घेऊन जाणारा ट्रक उतारावर घसरून रस्त्यावर प्लायवूड कोसळले, सुदैवाने तेथे रहदारी कमी असल्याने गंभीर अपघात झाला नाही, याठिकाणी वारंवार वाहने घसरलेली आहेत. असे रोहन चव्हाण यांनी सांगितले.

सादर ठिकाणी माल, सामान भरलेली अवजड वाहने चढावर असताना नियंत्रण सुटल्यामुळे मागे येतात. त्यातील माल समान रस्त्यावर धोकादायकरित्या पडते, मागून येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वर त्यातील समान कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मागील आठवड्यात येथे अपघात होऊन एक जण मृत्युमुखी पडलेला आहे. सदर रस्त्यावरील धोकादायक चढ उतार समतल करून रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी चिखली येथील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते रोहन चव्हाण यांनी केली आहे.
काय सांगता ! टाटा कंपनी आता आय फोन बनवणार ?
मोशीतील आंतरराष्ट्रीय सफारी पार्कच्या कामाला ‘चालना’ ; आमदार महेश लांडगे यांनी केला पाठपुरावा
दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणा-या कोयता गॅंगवर कडक कार्यवाही ची मागणी

