Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दादाराव आढाव तर प्रसिध्दी प्रमुख पदी...

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दादाराव आढाव तर प्रसिध्दी प्रमुख पदी युनूस खतीब यांची बिनविरोध निवड!

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.१५ जुलै – अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि.) संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ कार्यकारिणी २०२३ ते २०२४ साठी निवडणूक घेण्यात आली असून निवडणुकीत अध्यक्ष पदी दादाराव आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्था संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे तर निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव यांनी काम पाहिले. पिंपरी चिंचवड शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आज सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली.


यावेळी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या निवडनुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. निवडणुकीत पुढीलप्रमाणे कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली. अध्यक्ष दादाराव आढाव, समन्वयक कलिंदर शेख, उपाध्यक्ष गणेश शिंदे, विनय लोंढे, सरचिटणीस महेश मंगवडे, कोषाध्यक्ष बाबू कांबळे,चिटणीस संजय बोरा,अमोल डंबाळे कार्यकारणी सदस्य सायली कुलकर्णी, संतोष जराड, जितेंद्र गवळी, श्रद्धा कोतावडेकर-कामथे, विश्वास शिंदे, मुकुंद कदम तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून युनूस खतीब यांची निवड जाहीर झाली.

यावेळी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाचे अध्यक्ष भीमराव तूरुकमारे पत्रकार संघाचे सदस्य प्रीतम शहा, सुहास आढाव, अल्ताफ शेख, उमेश जाधव, यशवंत गायकवाड, विनोद शिंदे, प्रसाद बोरसे, शफीक शेख इत्यादी पत्रकार उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांनी उपस्थित राहून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कोतावडेकर तर आभार जितेंद्र गवळी यांनी मांडले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय