Monday, May 20, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘लोकशाही मराठी’ या वाहिनीने सोमय्या हे आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडिओ चॅट करतानाची बातमी दिली आहे. या बातमीने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये सोमय्या हे व्हिडिओ चॅट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये त्यांचे हावभाव अत्यंत घाणेरडे दिसत आहेत. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरीही या व्हिडिओमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही. आता किरीट सोमय्या यांनीच व्हिडिओची सत्यता तपासाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी मागणी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी त्यात म्हंटले आहे की, एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी विनंती केली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार प्रकरणी अनेक नेत्यांवर आरोप केले होते. बर्‍याच नेत्यांना कायदेशीर कारवाईमध्ये त्यांनी अडकवले आहे, असे असताना लोकशाहीच्या या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

हे ही वाचा :

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय