Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

मुंबई : मुंबईच्या वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला वाहुन गेल्याची घटना घडली आहे. मुंबई येथील ब्रँड स्टॅण्ड समुद्राच्या किनाऱ्यावर दगडावर बसून फोटो काढताना पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे महिला वाहून गेली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

---Advertisement---

वांद्रे येथे जोडपं आपल्या कुटूंबासह समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. पती पत्नी मुलीकडून व्हिडीओ व फोटो काढून घेत असताना पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे महिला वाहून गेली. ज्योती सोनार असं मृत महिलेचं नाव आहे. पती मुकेश हा गौतमनगर, रबाळे येथील रहिवासी असून सहलीचा आनंद घेताना त्याची पत्नी डोळ्यादेखत वाहून गेली आहे. या घटनेने सोनार कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

व्हायरल व्हिडिओत ज्योती सोनार या महिलेसोबत नेमकं काय झालं, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर महिला वाहून गेल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी केलेल्या शोधकार्यानंतर महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

हे ही वाचा

अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

मोटार : एक मानवीनिर्मित अरिष्ट – नवनाथ मोरे

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles