रामटेक : अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दीन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनाचा कार्यक्रम रामटेक (Ramtek) येथील गंगाभवनम सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. Ramtek
कार्यक्रमात किसान सभेचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अरुण लाटकर, माजी नगराध्यक्ष शोभा राऊत, अनिस च्या जिल्हा महिला कार्येवाह दुर्गा लोंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामटेक महिला समुपदेशक केंद्राच्या समुपदेशक दिपा चव्हाण यांनी भूषवले.
आश्रित महिलांना भारतीय संविधानाने ‘नागरिक’ बनवले तिथे महिलांना पुन्हा आश्रित बनवण्याचे काम सुरू आहे असे वक्तव्य अरुण लाटकर यांनी केले तर द्वेषाचे राजकारण पराभूत करा, महिलांचे लोकशाही हक्क वाचवा असे आवाहन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कल्पना हटवार यांनी केले.
महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत त्यांची जनजागृती करण्याची गरज आहे असे अध्यक्ष भाषणात दिपा चव्हाण यांनी सांगितले तर आभार नीता भांडारकर यांनी केले. कार्यक्रमात जमस च्या अध्यक्ष नीता भांडारकर, सचिव कल्पना हटवार, कांचन अडकणे, गौराबाई माकडे, कांचन उके, दुर्गा लोंढे, शुभा थुलकर, सरला नाईक, कल्पना गोंडाने, दीक्षा नाईक, अपर्णा वासनिक, अर्चना झंझाड, वर्षा वानखेडे, सुनीता डोंगरे, संगीता माकडे, कल्पना जोहरे, भारती गजभिये, गंगा टेंभूर्ने, करुणा खडसे, करिष्मा ठाकरे, निना धारे, करुणा पवनीकर, वैशाली बावनकुळे, अलका मेश्राम, अंजना गजभिये सहित इतर महिला उपस्थित होत्या.
हे ही वाचा :
मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू
महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा
जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा