Sunday, April 28, 2024
Homeग्रामीणJunnar : राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाचा जागतिक महिलादिन उत्साहात साजरा

Junnar : राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाचा जागतिक महिलादिन उत्साहात साजरा

जुन्नर / आनंद कांबळे : राजमाता जिजाऊ महिला विकास मंंच जुन्नर (Junnar) यांच्या वतीने जागतिक महिला दिन (International Women’s Day) विविध कार्यक्रमाच्या द्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. Junnar

राजमाता मंचाने दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमांचे योगिताताई सत्यशिल शेरकर यांनी केले. कार्यक्रम तीन सत्रात संपन्न झाले. सकाळच्या सत्रात होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथम क्रमांक प्रमिला भोकरे यांचा आला. त्यांना घरगुती पिठाची गिरणी व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

द्वितीय क्रमांक कविता हांडे, तृतीय क्रमांक आशा सहाणे, चतुर्थ क्रमांक पूजा भगत यांना अनुक्रमे मायक्रोवेव ओवन, इलेक्ट्रिक शेगडी, सोन्याची नथ व सन्मानचिन्ह देवून गौरविले. दुपारच्या सत्रात उपस्थित महिलांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर १८ते ३० व ३०ते ८० या वयोगटातील नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.

१८ते ३० वयोगट वैयक्तिक नृत्य प्रथम क्रमांक ऋतुजा गायकवाड, द्वितीय क्रमांक मेधा परदेशी, तृतीय क्रमांक सेजल दुबे यांनी मिळविला, त्यांना ३हजार रुपये, २ हजार रुपये, १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

१८ ते ३० वयोगट समूह नृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक ऋतुजा व श्वेता ग्रूप, द्वितीय क्रमांक पूनम नरोटे व ग्रूप यांनी मिळविला. त्यांना प्रत्येकी ५ हजार ३ हजार व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

३० ते ८० वयोगट वैयक्तिक नृत्य प्रथम क्रमांक श्वेता पवार, द्वितीय क्रमांक सुजाता जाधव, तृतीय क्रमांक रोहिणी वाघमोडे यांनी मिळविले. त्यांना प्रत्येकी ३ हजार, २ हजार, १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

३० ते ८० वयोगट समूह नृत्य -प्रथम क्रमांक सोनाली लोखंडे व ग्रुप, द्वितीय क्रमांक शिंदे गाव व ग्रूप, तृतीय क्रमांक राजमाता जिजाऊ महिला विकास मंच या ग्रूपला प्रत्येकी ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. बक्षिस वितरण समारंभ संध्याकाळच्या सत्रात संपन्न झाला.

जुन्नर तालुक्यातील कर्तृत्ववान महिला डॉ. पिंकीताई पंजाबराव कथे यांना तेजस्विनी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊ महिला विकासमंचाला सतत मदत करणारे माजी आमदार शरद सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार समारंभात पंजाबराव कथे, माजी आमदार शरद सोनवणे व डॉ.पिंकीताई कथे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुमित्राताई शेरकर या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या‌ त्या मृणाल डोळस (मिस नवी मुंबई) आणि मुग्धा धोत्रे (सिने नाटक कलाकार) या उपस्थित होत्या.

काजळे ज्वेलर्सकडून ५ पैजणांचा लकी ड्रॉ‌. व कीर्ती क्लाँथ सेंटरच्या राखी शहा यांजकडूध अकरा पैठण्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. महिलांसाठी सीमा पोटे यांचा ‘मी नार नखर्याची, हा लावण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला.

महिला दिनाच्या या कार्यक्रमास सुमारे १५०० महिला सहभागी होत्या. महिला दिन साजरा करण्यासाठी मंचाच्या सर्व सदस्यांनी महिनाभर मेहनत घेतली अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या अध्यक्षा अलकाताई फुलपगार व उपाध्यक्षा ज्योती चोरडिया यांनी दिली.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय