Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याRam Mandir Firing : अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात असलेल्या पीएसी कमांडोवर...

Ram Mandir Firing : अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात असलेल्या पीएसी कमांडोवर गोळीबार

Ayodhya ram mandir firing : अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर (Ram Mandir Firing) परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी तैनात असणाऱ्या पीएसी कमांडोला गोळी लागल्याची घटना घडली आहे. यात ५३ वर्षीय कमांडो राम प्रसाद यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

अयोध्येतील राम मंदिर परिसरात (Ram Mandir Firing) स्वतःच्याच एके-४७ रायफलीतून सुटलेली गोळी कमांडोच्या छातीच्या बाजूला लागली. या गोळीबारात पीएसी कमांडो जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी जखमींना तातडीने लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. मंगळवारी झालेल्या या मंदिर परिसरातील गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.

राम मंदिर हे करोडो हिंदुंचे श्रद्धा स्थान आहे. अनेक पर्यटक भारतात आल्यावर राम मंदिराला भेट देतात. मात्र असं असताना येथे गोळीबार कसा झाला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, ही घटना चुकून घडल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख

लोकप्रिय