Thursday, November 21, 2024
HomeराजकारणRahul Gandhi : राहुल गांधींनी दाखवला फोटो; लोकसभेत गदारोळ

Rahul Gandhi : राहुल गांधींनी दाखवला फोटो; लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली : महाभारतामध्ये अभिमन्यूबरोबर जे झालं होतं, तेच आज देशातील तरुणाई बाबत केलं जात आहे. सरकार हलव्याचे वाटप करत आहे आणि तो वाटणारे केवळ मूठभर लोक आहेत आणि वाटतात कुणाला तर ते केवळ 2-3% लोकांना ते वाटत आहेत. देशातील तरूण, शेतकरी, महिला, छोटे उद्योगपती, यांना एका चक्रव्यूहात अडकवलं जात आहे, त्यांना या बजेट मधून काही मिळालेले नाही, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारवर केली.

लोकसभेत बजेटवरील चर्चेत ते बोलत होते. भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी अर्थ मंत्रालयात अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आयोजित पारंपरिक हलवा समारंभाचे पोस्टर दाखवले. यावेळी लोकसभेत दोन्ही बाजूंनी जोरदार गदारोळ झाला. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) विरोधी पक्षनेते असल्याची जाणीव करून दिली.

Rahul Gandhi

राहुल गांधी यांनी सरकारला इंटर्नशिपचे पेपर लीक प्रकरणात घेरण्याचा प्रयत्न केला. पोस्टरमध्ये एकही आदिवासी, ओबीसी किंवा दलित अधिकारी दिसत नाही. ते म्हणाले, ‘देशाची खीर वाटली जात आहे आणि बाकी ७३ टक्के त्यात कुठेच नाही.’ केंद्र सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘तुम्ही लोक हलवा खात आहात पण बाकीच्या देशवासीयांना मिळत नाही.’

यावेळी भाजपा खासदारांनी अनेक वेळा राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. दोन लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. या चक्रव्यूहने पहिले काय केले? त्यामुळे रोजगार देणारे छोटे उद्योग उद्ध्वस्त झाले. नोटाबंदी, जीएसटी आणि कराचा बळी गेला.

अर्थसंकल्पात विशेष काहीच नसल्याची टीका करत त्यांनी देशातील शेतकरी,छोटे व्यावसायिक, मजूर, लहान व्यापाऱ्यांना कोणताही लाभ दिला नसल्याची टीका त्यांनी लोकसभेत केली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

शासकीय, निमशासकीय विभागात विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून ; आरोपीला अटक

अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संबंधित लेख

लोकप्रिय