Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Kolhapur floods : कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीचं आणि पुराचं पाणी शहरात शिरायला सुरुवात झाली आहे. शहरातील प्रमुख 54 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. (Kolhapur floods)

---Advertisement---

शहरातील सुतारवाडा, कुंभारगल्ली, जामदार क्लब येथील पुरबाधित भागातील चित्रदुर्ग मठ भागात आपात्कालीन परिस्थिती आहे तिथे रेस्क्यू ऑपरशन सुरु आहेत. कोल्हापूर मधील शाहुपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प परिसरात देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील अनेक रस्ते, धाबे, हॉटेल्स पाण्याखाली गेल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

कृष्णा-कोयना, वारणा नद्यांच्या परिसरात पर्जन्यवृष्टी, धरण पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. (Kolhapur floods)

काल राधानगरी धरणातून 10068 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 10117 क्युसेक्स आणि वरणा धरणातून 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामूळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. राज्यसरकारने सैन्यदलाची मदत कोल्हापूर, सांगली कडे पाठवण्यास सुरूवात केली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles