Pune: समाधान चौकात सिटी पोस्ट ऑफिस परिसरात झालेल्या धक्कादायक घटनेत पुणे महापालिकेचा टेम्पो मोठ्या खड्ड्यात कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि टेम्पोमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच परिसर सुरक्षित करण्यासाठी जवळपास 20 कर्मचारी आणि पोलिस अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिससमोरील रस्त्याचा काही भाग खचला, ज्यात हा टेम्पो कोसळला. या भागात सांडपाणी वाहिन्यांबाबत तक्रारी मिळाल्या होत्या . महापालिकेकडून दुरुस्तीचे काम सुरु असताना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नाले सफाईच्या कामासाठी पुणे महापालिकेचा टेम्पो पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचला होता. त्यानंतर ही घटना घडली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टेम्पो पोस्ट ऑफिसच्या इमारतीजवळ उभा असताना अचानक रस्त्याचा काही भाग कोसळला आणि टेम्पो भूमिगत झाला. हा प्रकार पाहून परिसरात गोंधळ उडाला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून टेम्पोतून उडी मारून आपला जीव वाचवला.
खड्ड्यात पाणी साचू लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने टेम्पो बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले.अपघातामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.
Pune
हेही वाचा :
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी