sangli: कवठेमहांकाळ तालुक्यातील एका वस्तीशाळेत चौथीमध्ये शिकत असलेल्या तीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. मुलींनी शिक्षकाच्या गैरवर्तनाची माहिती पालकांना दिल्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रत्यक्ष खातरजमा केली. त्यानंतर संतप्त पालकांनी शिक्षकाला शाळेतच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे. पोलिसांनी एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बदलापुर येथील घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
sangli
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती