जुन्नर (आनंद कांबळे) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर(Junnar)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या पद्मभूषण शरदचंद्रजी पवार इंडोअर स्पोर्ट्स हॉलमध्ये करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष निवृत्ती काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी, प्राचार्य डॉ महादेव वाघमारे, उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते, एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा कुंडलिक नेटके व तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत व सचिव संजय खराडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे जिमखाना विभाग प्रमुख डॉ अनिल बढे, प्रा मयुर बोंबले, प्रा विकास वाघमारे हे मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेत तालुक्यातील विविध गटात २५ शाळा व महाविद्यालया तील ऐकून २४७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे :
१४ वर्षाखालील मुले :
प्रथम क्रमांक- अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव
द्वितीय क्रमांक – शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर
तृतीय क्रमांक – अंजुमन हायस्कूल जुन्नर
१४ वर्षा खालील मुली :
प्रथम क्रमांक – अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव
द्वितीय क्रमांक – शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर
तृतीय क्रमांक – चैतन्य विद्यालय ओतूर
१७ वर्षा खालील मुले :
प्रथम क्रमांक – अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव
द्वितीय क्रमांक – शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर
तृतीय क्रमांक – शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर
१७ वर्षा खालील मुली :
प्रथम क्रमांक – चैतन्य विद्यालय ओतूर
द्वितीय क्रमांक – अंजुमन हायस्कूल जुन्नर
तृतीय क्रमांक – अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव
१९ वर्षा खालील मुले :
प्रथम क्रमांक – श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर
द्वितीय क्रमांक – गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव
तृतीय क्रमांक – अंजुमन हायस्कूल जुन्नर
१९ वर्षाखालील मुली :
प्रथम क्रमांक – गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव
द्वितीय क्रमांक- श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर
तृतीय क्रमांक – ज्ञानमंदिर ज्युनिअर कॉलेज आळे
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारे सर्व संघ पुढे जिल्हा पातळी साठी पात्र झाले आहेत. हे संघ जुन्नर तालुक्याचे पुढे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत यशस्वी खेळाडूंचे व संघाचे हार्दिक अभिनंदन मान्यवर मंडळीकडून करण्यात आले.
Junnar
हेही वाचा :
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी