पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पुणे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोमधून आता फक्त १०० रुपयांमध्ये दिवसभर प्रवास करता येणार आहे. मेट्रो प्रशासनाकडून ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे पुणेकरांना कमी पैशात मेट्रो प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. Pune metro news
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रहिवाशांसाठी मेट्रोचा प्रवास अधिक परवडणारा (affordable) बनवण्याच्या प्रयत्नात, पुणे मेट्रोने १०० रुपये किमतीचा नवीन दैनिक पास सादर केला आहे. या पासमुळे प्रवाशांना सकाळी ६ ते रात्री १० या व्यावसायिक वेळेत अमर्यादित मेट्रो सेवा मिळणार आहे.
मेट्रो कडून स्मार्ट कार्ड, मासिक पास ई सुविधा दिल्या जात आहेत.पुणे पिंपरी चिंचवडकर ज्यांना दररोज नोकरी, व्यवसाय निमित्त फिरावे लागते, त्या प्रवाशांना तसेच मेट्रोचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटक व. अन्य प्रवाशांना शंभर रुपयांना दैनंदिन पासची सुविधा खिशाला परवडणारी आहे. Pune metro
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते दिवाणी न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गांवर पासधारक अनिर्बंध प्रवासाचा आनंद घेऊ शकतात, अशी माहिती पुणे मेट्रोने ट्विटमध्ये दिली. महत्त्वाचे म्हणजे, पासधारकांना मार्गावरील कोणत्याही स्थानकावर अनेक वेळा प्रवेश आणि बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य कायम आहे
हेही वाचा :
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत