Friday, November 22, 2024
Homeजिल्हाPune : हिरडा नुकसानभरपाई विषयक शासन निर्णयाची अंमलबजावणी करा – किसान सभेची...

Pune : हिरडा नुकसानभरपाई विषयक शासन निर्णयाची अंमलबजावणी करा – किसान सभेची मागणी

Pune : हिरडा नुकसानभरपाई विषयक शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे केलेली आहे.

राज्यात, जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या, निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीपिकांचे,
फळबागांचे तसेच घरे व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झालेले होते. विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला होता. याबरोबरच या तालुक्यातील आदिवासी समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचे ही यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. Pune

सदरील नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.व नुकसान भरपाई विषयी अहवाल या अगोदर सादर ही करण्यात आला होता. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून किसान सभेच्या वतीने ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२४ असा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. नुकतेच दि.१५ फेब्रुवारी २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२४ असे सात दिवसांचे बेमुदत उपोषण प्रांत कार्यालय, मंचर येथील कार्यालयासमोर झाले होते.

या उपोषणाची व गावापातळीवर सुरु झालेल्या आंदोलनाची दखल घेत, दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात दि.३ जुन्र २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या, हिरडा शेतीमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत निर्णय झाला. व त्यानुसार दि.१२ मार्च २०२४ रोजी याबाबतचा अधिकृत शासननिर्णय आला होता.

या शासन निर्णयात सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी. व ही कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करावी असे नमूद केले आहे. हा शासननिर्णय येऊन लवकरच एक महिना पूर्ण होणार आहे. सद्यस्थितीत निवडणूक विषयक काम सुरु आहे. याची संघटनेस कल्पना आहे. परंतु शासननिर्णयात जे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी व लवकरात लवकर हिरडा नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती किसान सभेने केली आहे.

निवेदनावर किसान सभेचे ॲड. नाथा शिंगाडे, डॉ. अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, राजू घोडे, महेंद्र थोरात, आमोद गरुड, विकास भाईक, लक्ष्मण जोशी, गणपत घोडे, रामदास लोहकरे, कमल बांबळे, बाळू काठे यांची नावे आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !

भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा

सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा सुजला ?

विरोधकांनी फक्त परिवाराचाच विकास केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

संबंधित लेख

लोकप्रिय