पुणे : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर वर पाणी साचले आहे. ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन बंद असून भांडुप आणि कुर्ला रेल्वे पाणी साचले आहे. ठाणेपर्यंत ट्रेन जात असल्या तरी उशीराने धावत आहेत. ऑफिसला जाणाऱ्यांची मुंबईत तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वे सह हार्बर लाईन पश्चिम रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबले आहे. (PUNE)
पुण्यातून मुंबईला कामाला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे नागरिक रोज रेल्वेने अपडाऊन करत असतात. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या तब्बल आठ एक्सप्रेस गाड्या रद्द कऱण्यात आल्या आहेत. (PUNE)
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. Pune
पुण्याहून मुंबईसाठी सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. (PUNE)
येथील पाणी कमी झाल्यावर या गाड्यांची सेवा पुर्ववत करण्यात येणार आहे, मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन तसेच एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल