Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनापुण्यातील चाकण एमआयडीसीत कोरोनाचे थैमान एकाच कंपनीत 110 कोरोना पॉझिटिव्ह

पुण्यातील चाकण एमआयडीसीत कोरोनाचे थैमान एकाच कंपनीत 110 कोरोना पॉझिटिव्ह

 

पुणे  : देश – विदेशातील नामवंत कंपन्या विस्तारलेल्या पुण्यातील चाकण एमआयडीसी मध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. एमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 

ऑटोमोटिव्ह सिटिंग आणि ई – सिस्टम्स बनवणाऱ्या नामांकित कंपनीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकतंच एका कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीने 800 कामगारांच्या खाजगी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या होत्या त्यातील 110 कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आणखी काही कामगारांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने कंपनीने कोरोनाच्या उपाय योजनांचं उल्लंघन केल्याचं प्रशासनाच्या तपासात समोर आल आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने काही दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या एकशे दहा जणांच्या संपर्कात कोण कोण व्यक्ती आल्या होत्या याचाही शोध घेतला जाणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय