Thursday, May 2, 2024
Homeआरोग्यकोरोनाआपत्कालीन परिस्थितीत बुस्टर डोस म्हणून ‘या’ लसीला डीसीजीआयने दिली मान्यता

आपत्कालीन परिस्थितीत बुस्टर डोस म्हणून ‘या’ लसीला डीसीजीआयने दिली मान्यता

मुंबई : काही दिवसांपासुन देशातील आटोक्यात आलेली कोरोनाची रूग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात पुन्हा मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना आता कोर्बेव्हॅक्स या लसीला डीसीजीआयने आपत्कालीन परिस्थितीत बुस्टर डोस म्हणून वापर करण्यास मान्यता दिली आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, आता हैदरबाद येथील बायोलॉजिकल ई लिमिटेड या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कोर्बेव्हॅक्स या लसीला डीसीजीआयने आपत्कालीन स्थितीत बुस्टर डोस म्हणून वापरण्यास मान्यता दिली आहे. डीसीजीआयच्या या निर्णयानंतर या लसीच्या माध्यमातून बुस्टर डोसची गरज पूर्ण होईल. कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस सहा महिन्यानंतर कोर्बेव्हॅक्स ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे.

दरम्यान, या कंपनीने मे महिन्यात लसीची किंमत ८४० रुपयांवरुन २५० रुपये केली होती. याआधी डीसीजीआयने ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी या लसीच्या वापराला मान्यता दिली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय