Friday, May 17, 2024
Homeजुन्नरकोपरे येथे 'मनरेगा कायदा' विषयावर किसान सभेचा संवाद मेळावा

कोपरे येथे ‘मनरेगा कायदा’ विषयावर किसान सभेचा संवाद मेळावा

मनरेगा कायदाच गावात सन्मानाचा रोजगार देऊ शकतो – लक्ष्मण जोशी 

जुन्नर : कोपरे, जांभुळशी या गावातील महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून महिला आणि ग्रामस्थांशी अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी ‘मनरेगा कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना जोशी म्हणाले की, मनरेगा कायदा गावांमध्ये हक्काचा रोजगार मिळवून देऊ शकतो. कारण हा कायदा रोजगार आणि काम मागण्याचा हक्क देतो. मनरेगा अंतर्गत गावातील रस्ते, गाव तळी, शेत तळी, वृक्ष लागवड, शेती बांध बंदिस्ती, गावातील सार्वजनिक विहीर अशी अनेक कामे करता येतात. यामुळे गावाचा विकास होतो आणि रोजगार तयार होतो.

बाळहिरडा खरेदीचा निर्णय लवकरच घेणार – नाशिक येथे बैठक, काय झाली चर्चा वाचा !

नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 140 पदांसाठी भरती, 24000 रूपये पगाराची नोकरी

महिलांचे सक्षमीकरण करणार मनरेगा कायदा आहे. महिन्याचे फक्त 26 दिवस काम केल्यानंतर 6656 रुपये मिळतात आणि तेही थेट बँक खात्यावर जमा होतात. त्यामुळे कायदा महिलांना सक्षम करतो. यावेळी पैसा समन्वय मधुकर ठोंगिरे यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी वनधन योजनेचे तालुका समन्वयक राजेंद्र शेळके, किसान सभेचे सदस्य शंकर माळी, रोहिणी माळी, फसाबाई कवटे, तसेच महिला ग्रामसंघ व बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव बरोबर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय