Sunday, July 14, 2024
Homeआरोग्यकोरोनाचिंता वाढली, राज्यात आज आढळले कोरोनाचे तब्बल "इतके" रूग्ण

चिंता वाढली, राज्यात आज आढळले कोरोनाचे तब्बल “इतके” रूग्ण

मुंबई : राज्यात कोरोना रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आजही राज्यातील रुग्णसंख्येतील वाढ ही कायम आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आज २८१३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतल्या सततच्या वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे पुन्हा मास्कसक्तीही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आज राज्यात दिवसभरात २८१३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १०४७ रुग्ण आज कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच एका कोरोना रुग्णाचा मृत्युही झाला आहे. तर मुंबई मध्ये मागील २४ तासात १७०२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. मुंबईतील आज ७०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सध्या मुंबईमध्ये ७९९८ एकूण सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील सर्वात जास्त रूग्ण हे मुंबईत आढळून येत असल्याने ही आकडेवारी राज्याची चिंता वाढविणारी आहे.

राज्यातील कोरोना या संख्येमुळे मुख्यमंत्र्यांकडून लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत असून आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय