Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यातील कोरोना संख्येत होतेय वाढ, केंद्राने राज्याना दिल्या "या" सुचना

राज्यातील कोरोना संख्येत होतेय वाढ, केंद्राने राज्याना दिल्या “या” सुचना

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लादण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यापासून कोरोनाची रूग्ण संख्या आटोक्यात आली होती, मात्र आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा. मास्क वापरा, लसीकरण करून घ्या, हात धुवा व अंतर ठेवा असे आवाहन केले आहे.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

या वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांना पत्र लिहिले असून टेस्टिंग, लसीकरण वाढवा, योग्य खबरदारी घ्या, अशा सूचना दिल्या आहेत. पुढे म्हटले आहे, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे, असे पत्रात म्हंटले आहे. या जिल्ह्यात टेस्टिंग, लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

मेगा भरती : भारतीय डाक विभागात 38926 पदांची मोठी भरती, तत्काळ अर्ज करा !

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय, यापुढे ‘या’ तारखेला साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय