Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनुपुर शर्मा यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे पिंपरीत गुन्हा दाखल

नुपुर शर्मा यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे पिंपरीत गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : पिंपरी पोलीस ठाण्यात 153A,153B, 295A, आणि 505 या कलामनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली आहे. तसेच  पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या विरोधात युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, कार्याध्यक्ष फजलभाई शेख, नगरसेविका संगीताताई ताम्हणे, अर्बन सेलचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, ख्रिचन सेलचे अध्यक्ष पूर्णा स्वाईन, अल्पसंख्याक सेलचे कमरूनीसा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख म्हणाले, भाजपच्या मुख्य प्रवाहात त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात जे वादग्रस्त विधान केलं त्यामुळे धर्मनिरपेक्ष देश म्हणून भारताची जी प्रतिमा जगभरात होती ती मलीन करण्याचं काम नुपुर शर्मा यांच्यामुळे झालं. त्यांच्या या एका वक्तव्यामुळे परदेशात नोकरी करणाऱ्या लाखो भारतीयांच्या नोकरीवर गदा आली, तसेच जगभरात ‘बॉयकॉट इंडिया’ हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला याला सर्वस्वी नुपुर शर्मा आणि भारतीय जनता पक्ष हेच जबाबदार आहेत. यापुढे कोणत्याही धर्माबद्दल अपशब्द काढणाऱ्या विकृत मानसिकतेला आमचा विरोध असेल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट म्हणाल्या ‘दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजप व त्यांचे नेते वारंवार करत आहेत. सर्व धर्म समभाव ही संस्कृती भारताची असून यात फूट पाडून भारतात मोठ्या प्रमाणात दंगली घडाव्यात याचं षडयंत्र भाजपचे नेते करत आहेत.या कृत्याचा निषेध करून त्यांच्या या देशाला दोन भागात विभाजन करणाऱ्या षडयंत्र आम्ही वेळोवेळी हाणुन पाडू असेही त्या यावेळी म्हणाल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

कार्याध्यक्ष फजल शेख म्हणाले, ‘नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे निर्यात होणाऱ्या वस्तूवर निर्बंध लादले गेले ही गोष्ट दुदैवी असून भाजप सतत एका विशिष्ट समाजाला जाणून बुजून टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे.मध्यंतरी  मशिदीच्या भोंग्या वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला पण याला शहरातील लोकांनी खतपाणी घातलं नाही. केंद्रातील सरकार चालवताना आलेले अपयश झाकण्यासाठी भाजप नेते हिंदू-मुस्लीम वाद पेटवून महागाई बेरोजगारी सारख्या मूळ मुद्द्याला बगल देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत”. 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी ‘भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत’ही प्रतिज्ञा यावेळी सामुहिकरीत्या वाचण्यात आली. 

पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर वाघमारे, मंगेश बजबळकर, शाहरुख शेख, दीपक गुप्ता, युवानेते प्रवीण खरात, निखील गाडगे, सतेज परब, मयुर खरात, ओम श्रीरसागर, अफ्रिद शिकलगार, तोहिद शेख, सालीम शेख, जहीर शेख, लवकुष यादव, साहुल शेख, जे एम जहागीरदार, हबीब शेख, इरफान भाई शेख, अमोल बेंद्रे व मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय