Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणपुणे : अंगणवाडी कार्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर निदर्शने

पुणे : अंगणवाडी कार्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर निदर्शने

पुणे : अंगणवाडी कार्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर निदर्शने केली. यावेळी उत्तर प्रदेशातील बदायुॅं येथील अंगणवाडी मदतनीसच्या बलात्कार करून झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यात आला. तसेच शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे व कामगार विरोधी श्रमसंहिता मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच शुभा शमीम, वसंत पवार व नाथा शिंगाडे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. 

सीटू व सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा घरकामगार संघटना यांच्या वतीने आज पुणे जिल्हा परिषदेवर निदर्शने करण्यात आली. त्यात प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शन, मोबाईल व ऑनलाईन काम, मदतनिसांच्या सेविका पदी थेट नियुक्तीचे निकष आदी मागण्यांवर भर देण्यात आला. 

निदर्शनांमध्ये सीटूचे जिल्हा अध्यक्ष कामगार नेते अजित अभ्यंकर, जिल्हा सचिव वसंत पवार, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष नाथा शिंगाडे, पुणे जिल्हा घरकामगार संघटना व जनवादी महिला संघटनेच्या नेत्या किरण मोघे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष आशाबी शेख व सचिव रजनी पिसाळ, अंगणवाडी व जनवादीच्या नेत्या हिराबाई घोंगे व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमीम यांंची भाषणे झाली. सीटू सहसचिव मोहन पोटे यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय