Monday, May 13, 2024
Homeराज्यमराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या अमानुष पोलीस लाठीमाराचा जाहीर निषेध

मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या अमानुष पोलीस लाठीमाराचा जाहीर निषेध

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरु होते. याच दरम्यान 1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करते, असे एसएफआय चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ व राज्य सचिव रोहिदास जाधव म्हणाले. police lathicharge on Maratha community protest 

देशभरातील नागरिकांना आपल्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. शांततेने चाललेले आंदोलन चिरडून टाकणे म्हणजे जनतेच्या लोकशाही अधिकारावर घाला आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशात अनेक ठिकाणी जनतेचे असे आंदोलन दाबून टाकण्याचा अनुभव आहे. सरकारच्या अशा मानसिकतेचा एसएफआय जाहीरपणे तीव्र निषेध करते, असेही म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय