Thursday, May 16, 2024
Homeराजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले देशाला संबोधित; केल्या या महत्वाच्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले देशाला संबोधित; केल्या या महत्वाच्या घोषणा

(प्रतिनिधी):- कोरोनाची महामारी आणि चीन-भारत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला, यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :-

◆ लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर अनलॉकमध्ये वैयक्तिक व सोशल डिस्टन्सिंगवर दुर्लक्ष केलं जात आहे, ही चिंतेची बाब आहे.

◆ अनलॉक 2 मध्ये प्रवेश करत असताना त्यासोबत आता असा ऋतु आला आहे की ज्या काळात सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार बळावतात, त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

◆ लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. अनलॉकमध्येही देशातील नागरिक, सरकारी अधिकारी व संस्थांनी पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज आहे.

◆ कंटेन्मेंट झोवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. जे लोक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना रोखावे लागणार आहे. समजावून सागावं लागेल.

◆ केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनाही आणली, गेल्या तीन महिन्यात २० कोटी जनतेच्या जनधन खात्यात ३१ हजार कोटी जमा केले गेले.

◆ भारतातही राज्य सरकारला अधिक काळजी घ्यायला हवी. गावाचा प्रधान असो की नगरसेवक सर्वांनी काळजी घ्यायला हवी.

◆ स्थानिक प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमाच्या वर पंतप्रधान सुद्धा नाही.

◆ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा विस्तार नोव्हेंबरपर्यंत करण्यात आला असून त्यावर 90 हजार कोटी पेक्षा जास्त खर्च होणार आहे.

◆  भारत – चीन संघर्षावर पंतप्रधानांनी काहीही बोलले नाही.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय