Wednesday, May 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दिघी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात साजरी

PCMC : दिघी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात साजरी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दिघी येथील श्री कॉलनी येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.

यावेळी ऋषिकेश जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा समजावून सांगितली, छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवामध्ये विठाई महिला भजनी मंडळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पाळणा सादर केला. तसेच इतिहास अभ्यासक असणारे संतोष घुले यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कसे होते या विषयावर मार्गदर्शन केले. pcmc news

कार्यक्रम प्रसंगी स्वरा तापकीर , शर्वरी कोरडे, आराध्य कोरडे , यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमांमध्ये अविरत श्रमदान निसर्गा सेवा संस्थेचे जितेंद्र माळी, शंकर जगताप , विक्रम पत्रे, जयंत शेरेकर, मोहन कदम, तुकाराम शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमानिमित्त श्री कॉलनी मित्र मंडळ दिघी, यांच्या वतीने मातृछाया बाल आश्रम दिघी मधील मुलांना अन्नदान करण्यात आले.

यावेळी संजय काशीद, पुंडलिक पाटील, राजेंद्र तापकीर, अशोक निकम, महेश डबरे, व्यंकट बाबळसुरे, शिवाजी नांदे,अनिल पवार, गोपाल निंबाळकर, अंकुश मुळे, विलास मिसाळ यांनी उत्सवात सहभाग नोंदवला .

श्री कॉलनी अविरत श्रमदान यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश वीर यांनी केले तर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावरील माहितीपट ऋषिकेश जाधव, प्रकाश वीर, नामदेव राठोड यांनी सादर केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय