पिंपरी चिंचवड / क्रांती कुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डूडूळगाव येथे १ हजार १९० सदनिका उभारण्यात येत आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून ३० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी महापालिकेकडे ऑनलाईन पद्दतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. (PM awas Yojana)
केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधणे प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतील सदनिकांकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून दि.३० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ पासून मागविण्यात येत आहेत.
महापालिकेकडे ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांची छाणणी करुन लाभार्थी निश्चित करण्यात येणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. (PM awas Yojana)
योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अटी व शर्ती पूर्तता करणे आवश्यक आहे
या योजनेसाठी नागरिकांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवाशी नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करु शकतात.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत येणाऱ्या अर्जदारांचा कुंटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असावे, अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी, पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत यापुर्वी च-होली, रावेत, बो-हाडेवाडी, पिंपरी व आकुर्डी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु, सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतिक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करु शकतात. (PM awas Yojana)
आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे, पिंपरी चिंचवड , हवेली किंवा मुळशी येथील तहसिलदार यांच्या स्वाक्षरीने असलेला उत्पन्नाचा दाखला(सन २०२३-२४ आर्थिक वर्ष) किंवा १ वर्षाचा इनकम टॅक्स रिटर्न (ITR) किंवा फॉर्म १६/१६अ (सन २०२३-२४ आर्थिक वर्ष) यापैकी एक असणे आवश्यक आहे.
जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.ज., इतर मागासवर्गीय) (फक्त अर्जदाराचे, कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही) फक्त महाराष्ट्रातील रहिवासी
जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदाराचे (उपलब्ध असल्यास)
आधार कार्ड (अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे) पिंपरी चिंचवड शहरातील
पॅनकार्ड (अर्जदार व सह अर्जदार)
बँक पासबुक (अर्जदार) पासबुक खाते तपशील पृष्ठ व रद्द केलेला चेक
मतदान ओळखपत्र (अर्जदार) पिंपरी चिंचवड शहरातील
भाडे करार (नोंदणीकृत / नोटरी किमान र.रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
संमतीपत्र (नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचे किमान र.रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र) पिंपरी चिंचवड शहरातील, विज बिल (चालु महिन्याचे राहत्या पत्त्यावरील) पिंपरी चिंचवड शहरातील
अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल दाखला) फक्त महाराष्ट्रातील रहिवासी
आरक्षणनिहाय माहिती
या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या सदनिकांचे आरक्षण निहाय विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५९५ सदनिका देण्यात येणार असून अनुसूचित जातींसाठी १५५ सदनिका, अनुसूचित जमातीसाठी ८३ सदनिका, इतर मागास प्रवर्गासाठी ३५७ सदनिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षणनिहाय विभागणी अंतर्गत दिव्यांग नागरिकांसाठी ५ टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्जासोबत १० हजार रुपये अनामत रक्कम तसेच ५०० रुपये नोंदणी शुल्क असे एकूण १० हजार ५०० रुपये नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. सदनिकांच्या सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतिक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम योजनेचा अर्ज भरताना नमुद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने परत करण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डूडूळगाव येथे उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पासाठी पुढीलप्रमाणे शासन आणि लाभार्थी यांची भागीदारी असणार आहे. सदनिकेची एकूण किंमत १६ लाख ६४ हजार १७३ रुपये असणार आहे. यामध्ये केंद्रशासन प्रती सदनिका १ लाख ५० हजार रुपये अनुदान देणार असून राज्यशासनाद्वारे प्रती सदनिका १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तर लाभार्थी यांना १४ लाख १४ हजार १७३ रुपये प्रती सदनिका स्वहिस्सा भरावा लागणार आहे.
पात्र अर्जदारांनी https://pcmc.pmay.org या सांकेतीक स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी. तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेबाबत अधिक माहितीसाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी, अशी माहिती उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती