Telegram : सोशल मीडिया हे तरुणाईचे मोठे व्यसन बनले आहे. लोक सतत सोशल मीडियावर अपडेट्स चेक करत असतात. टेलिग्राम हा भारतातील सर्वाधिक वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरून अनेक लोक स्टडी मटेरियल, वेबसिरीज आणि मुव्हीज शेअर करतात.
मात्र, टेलिग्रामच्या (Telegram) वापरावर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी टेलिग्रामवर पेपर लीक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. टेलिग्रामवरून वसुली, सट्टेबाजी, आणि खोट्या बातम्या पसरवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या कारणांमुळे सरकारने टेलिग्राम अॅपची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमध्ये काही तथ्ये समोर आल्यास, टेलिग्रामच्या वापरावर बंदी घालण्यात येऊ शकते.
फ्रान्समध्येही टेलिग्रामचे सीईओ पावेल ड्युरोव यांना अटक करण्यात आली होती. फ्रान्समधील OFMIN संस्थेने टेलिग्रामवर फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबरबुलींग, आणि बालगुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे आरोप केले आहेत.
टेलिग्रामवर भारतात बंदी आल्यास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे टेलिग्रामच्या वापरावर सरकारचा निर्णय काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा :
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
मोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष
कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात
गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा