Monday, January 13, 2025
HomeNewsपिंपरी चिंचवड : शालेय विद्यार्थ्यांसाठी स्ट्रेन ब्रिटन कोरोना तपासणी

पिंपरी चिंचवड : शालेय विद्यार्थ्यांसाठी स्ट्रेन ब्रिटन कोरोना तपासणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी मध्ये पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांसाठी स्ट्रेन ब्रिटन कोरोना तपासणी करण्यात आली.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक दोन जाधववाडीमध्ये पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांसाठी स्ट्रेन ब्रिटन करोना तपासणी महापौर राहुल जाधव व मंगल  जाधव यांच्या प्रयत्नातून करण्यात आली. तसेच नागरिकांची सुध्दा तपासणी यावेळी करण्यात आली.

प्रभागातील २१० मुले व १०० नागरिकांनी मोफत ट्रेन ब्रिटन कोरोना चाचणीला उस्फूर्त प्रतिसाद दिला व समाधान व्यक्त केले. यामध्ये अभिनव विद्यालय व ज्ञानज्योती शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक सहभागी झाले.

संबंधित लेख

लोकप्रिय