Friday, April 19, 2024
Homeग्रामीणबुलढाणा : दयाभाई खराटे स्मृती अभिवादन सभेत पत्रकारिता गौरव पुरस्कार व उल्लेखनीय...

बुलढाणा : दयाभाई खराटे स्मृती अभिवादन सभेत पत्रकारिता गौरव पुरस्कार व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान

मलकापूर : समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 12 व्या स्मृती दिनानिमित्त महेश भवन, मलकापूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पत्रकारिता गौरव, समाजगौरव, कलावंत सन्मान पुरस्कार समाजरत्न दयाभाई खराटे फाऊंडेशन मलकापूर द्वारा देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दयाभाई खराटे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एम. टी. इंगळे हे होते, तर भन्ते महानाम, भन्ते मोग्गलायन यांच्या विशेष उपस्थितीसह मंचावर सभेचे निमंत्रक वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, रामकृष्ण रजाने, भारिप केंद्रीय सदस्या विशाखाताई सावंग, महिला जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी, शाहीर डी. आर. इंगळे, एस. एस. वले जी. कोषाध्यक्ष बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडीचे जि. उपाध्यक्षा नगरसेविका प्रितीताई शेगोकार, माजी उपाध्यक्षा वर्षाताई इंगळे, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, जिल्हा सचिव तुळशीराम वाघ, महिला जिल्हा महासचिव पुजाताई खेते, आयटी जिल्हाप्रमुख ऍड. रागिणी तायडे, जिल्हा सदस्या लक्ष्मीताई मोरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई इंगळे, जेष्ठ पत्रकार नत्थुजी हिवराळे, उल्हासभाई शेगोकार, सतीश दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना महामारीच्या काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्या प्राणाची बाजी लावून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व अविरत कार्य करणाऱ्या व्यक्तींची राष्ट्रभक्ती संपुर्ण महाराष्ट्राने अनुभवली, अशा कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. जी. ओ. जाधव यांना, तसेच पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी यांना व विद्युत वितरण क्षेत्रातील सहाय्यक अभियंता अमोल काळबांडे यांना प्रदान करण्यात आला.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार विरसिंह राजपूत संपादक मलकापूर आजतक, अशोक जसवानी संपादक खबरे शामतक, तुकारामजी रोकडे पत्रकार दै. सम्राट, तर पत्रकारिता सन्मान पुरस्कार विशाल पेटारे संपादक महाराष्ट्र जनभूमी, राजेश बाठे संपादक आर सी न्युज, अतुलभाऊ होले ता. प्रतिनिधी पुण्यनगरी, शैलेश वाकोडे संपादक दै. सत्यप्रतिमा, मिर्झा असीम बेग संपादक विदर्भ सिटीजन, शेषराव सोपाने संपादक जनतेचा बातमीदार, अमीन शहा संपादक पोलिसनामा, सागरकुमार झनके रिपोर्टर एम24 न्युज, शेख निस्सार ता. प्रतिनिधी जळगाव उन्नती, नविल वाघ रिपोर्टर आयबी सेवन, पत्रकार किशोर इंगळे, दीपक अहिरे, यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांताराम सोनोने, विलास तायडे, यासिन कुरेशी, संतोष इंगळे, भीमराज मोरे, मधुकर निकम, अजय निकम, प्रवीण के इंगळे, पँथर सेनेचे विजय इंगळे, राष्ट्रपाल सपकाळ, सुमित वाकोडे, आकाश सरदार, मुकेश वाकोडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव खराटे यांनी केले तर आभार निमंत्रक अतिशभाई खराटे यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय