Monday, May 6, 2024
Homeआंबेगावआंबेगाव : प्रा.संदीप चपटे यांना 'पीएचडी' पदवी

आंबेगाव : प्रा.संदीप चपटे यांना ‘पीएचडी’ पदवी

घोडेगाव : आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाचे माजी विद्यार्थी प्रा.संदीप भागू चपटे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखे अंतर्गत मराठी विषयातील पीएच.डी.(विद्यावाचस्पती) ही पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यांनी ‘डॉ.गोविंद गारे यांच्या साहित्याचा समग्र अभ्यास’ या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. त्यांना प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी मार्गदर्शन केले आहे.

प्रा.संदीप चपटे यांनी आपल्या या अभ्यास, संशोधनातून ‘गोविंद गारे व्यक्ती आणि वाड़मय’, ‘गोविंद गारे यांचे काव्यलेखन’, ‘गोविंद गारे यांचे चरित्रलेखन’, ‘गोविंद गारे यांचे ललितलेखन’, ‘गोविंद गारे यांचे वैचारिक लेखन’,’गोविंद गारे यांचे संशोधनात्मक, ऐतिहासिक, लोकसाहित्यविषयक लेखन’, ‘गोविंद गारे यांचे इतर लेखन’ या विविध प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी गोविंद गारे यांच्या साहित्याचा समग्र अभ्यास आपल्या संशोधनातून सादर केलेला आहे. 

प्रा.संदीप चपटे हे महाविद्यालयाच्या मराठी विभागातील माजी विद्यार्थ्यांपैकी पीएच.डी.ची पदवी मिळविणारे 8 वे विद्यार्थी आहेत. तळा जि.रायगड येथील द.ग.तटकरे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रो.डॉ.नानासाहेब यादव हे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रो.डॉ.प्रभाकर देसाई, डॉ.तुकाराम रोंगटे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष शाम होनराव, सचिव अक्षय काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. मुकुंद काळे, कार्याध्यक्ष राजेश काळे, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल कमिटीचे चेअरमन बाळासाहेब काळे, तसेच प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब गव्हाळे, डॉ.पुरुषोत्तम काळे, प्रा.पोपट माने यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय