Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ओझरकरवाडी शाळेत जाळीसह वृक्षारोपण

PCMC : ओझरकरवाडी शाळेत जाळीसह वृक्षारोपण

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरकरवाडी (मुळशी) येथे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, साग, चिंच, करंज, अशोक, बदाम, कडुलिंब अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. pcmc

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, वेदांत गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज बोरकर, रिहे केंद्राचे केंद्रप्रमुख मोरे साहेब, रिहे गावचे सरपंच सारिका मोरे, पोलीस पाटील सारिका मिंडे, ग्रामसेविका सारिका टाकळीकर, शाळेचे मुख्याध्यापक राऊत, अंगणवाडी, सुनंदा ओझरकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे, गणपत ओझरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामदास ओझरकर, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. आभार सहशिक्षिका श्रीमती साबळे यांनी मानले. pcmc

निवृत्ती महाराज बोरकर म्हणाले, की, वृक्षारोपण चळवळ ही आज जगाची गरज बनली आहे. गरीब, श्रीमंत अशा सर्वांनीच झाडे लावून ती वाढवली पाहिजेत. झाडे ऑक्सिजन देतातच, पण सर्वात महत्त्वचे म्हणजे झाडे सावली, फळे देताना कोणताही भेदभाव करीत नाहीत. त्यामुळे समाजानेही एकसंध राहिले पाहिजे.

वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले, की मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वर्षभरात पाच हजार झाडे लावून जतन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज अन्न, वस्त्र, निवारा आणि शुद्ध हवा या माणसाच्या मूलभूत गरजा बनलेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून जतन केले पाहिजे. याचाच भाग म्हणून ओझरकरवाडी शाळेत जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले.

रिहे गावचे सरपंच सारिका मोरे, पोलीस पाटील, सारिका मिंडे, ग्रामसेविका सारिका टाकळीकर यांनीही वृक्षारोपणाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

संबंधित लेख

लोकप्रिय