पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भारतीय संस्कृती मंच यमुनानगर यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे 24 वे वर्ष आहे. सकाळी ७ वाजता श्री अष्टविनायक मंदिर यमुना नगर येथे गणपतीची, गुढीची व ग्रंथदिंडीची पूजा करून शोभायात्रेची सुरुवात झाली. pcmc news
शोभा यात्रेमध्ये श्रीराम रथ, केरळी वाद्यवृंद, देशातील विविध प्रांतातील नागरिक (राजस्थानी समाज, माहेश्वरी समाज, गुजराती समाज, पंजाबी समाज इ.) दाक्षिणात्य कांतारा वेशभूषेतील कलाकार सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील विविध पारंपरिक वेशातील नागरिक, ढोल ताशा पथक, पौराणिक तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतील शालेय मुले, महिलांचे लेझीम पथक, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक बहुसंख्याने सहभागी झाले होते. pcmc news
शोभा यात्रेमध्ये आमदार महेश लांडगे व सिने अभिनेत्री नेहा कुलकर्णी सहभागी झाले होते. शोभायात्रेची सांगता श्रीराम मंदिर येथे झाली. “मेरे घर राम आए है” या संकल्पनेवर आधारित शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू
मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा
मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा झटका
काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !
भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा
सीमा हैदरला पतीकडून जबर मारहाण ; डोळा काळानिळा, चेहरा सुजला ?