Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी चिंचवड विद्यापीठ - एनएसई अकादमीमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

PCMC : पिंपरी चिंचवड विद्यापीठ – एनएसई अकादमीमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

पीसीयु मध्ये शिकवले जाणार अर्थविषयक फिंटेक अभ्यासक्रम PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : विद्यार्थ्यांमध्ये अर्थ व्यवस्थापन शिक्षणाची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेऊन आर्थिक शिक्षण वाढीसाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयु) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने एनएसई अकादमीसोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे, बुधवारी (दि.४) पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील आणि एनएससी अकादमीचे सह-उपाध्यक्ष एस. रंगनाथन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.(PCMC)

बाजारातील आर्थिक व्यवस्थापनाची मागणी पाहता विद्यार्थ्यांचा अर्थ क्षेत्राकडे जाण्याचा कल वाढला आहे. यातून अर्थ क्षेत्राची कार्यपध्दती, फिंटेक या नव्याने उभारीस आलेल्या क्षेत्राकडे विद्यार्थी उज्ज्वल भविष्य आणि स्थैर्य प्राप्त करून देणारे क्षेत्र म्हणून पाहतो. या करारामुळे पीसीयुच्या विद्यार्थ्यांना फिंटेक, वित्तीय क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित विशेष प्रशिक्षण एनएसई अकादमीतर्फे देण्यात येणार आहे.

या करारामुळे विद्यार्थ्यांना वित्तीय क्षेत्राची संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण मिळणार आहे. एनएसई अकादमीच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड विद्यापीठात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या करारामुळे वित्तीय व्यवस्थापनांच्या क्षेत्रातील सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावसायिक समुहातील अंतर कमी होईल असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

वडगाव मावळ, साते येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेकडून एनएसई अकादमी सोबत हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. जागतिक पातळीवर फिंटेक क्षेत्राची घोडदौड आणि व्याप्ती पाहता विद्यार्थ्यांना करीयरचे नवे दालन या करारामुळे उपलब्ध होईल, असा विश्वास एनएसई अकादमीचे एस. रंगनाथन यांनी व्यक्त केला.

या करारामुळे वित्त आणि बँकिंगच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये आणि विशेषज्ञता प्राप्त होण्यास मदत होईल अशी अपेक्षा रंगनाथन यांनी व्यक्त केली. यावेळी रंगनाथन यांनी पिंपरी चिंचवड विद्यापीठातील प्राध्यापकांना फिंटेक क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी उद्योजक तज्ज्ञ प्रतापराव पवार, आशियाई विद्यापीठ अध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ डॉ. के. के. अग्रवाल, राज्य सरकारचे नामनिर्देशित सदस्य सलीम शिकलगार आणि राजेश पाटील, उद्योजक तज्ज्ञ सचिन इटकर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, व्यवस्थापन विद्या विभाग प्रमुख डॉ. अमित पाटील, डॉ. अजय शर्मा आदी उपस्थित होते. प्रा. अंकूर श्रीवास्तव आणि प्रा. मरुगन शुक्ला यांनी सामंजस्य करारासाठी पुढाकार घेतला. pcmc

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. pcmc

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

संबंधित लेख

लोकप्रिय